आजकाल, मोठी कार खरेदी करण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे आणि ग्राहक एसयूव्ही आणि एमपीव्ही खरेदी करत आहेत. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह बाहेर फिरायला जायचे असेल किंवा मित्रांबरोबर फिरायला जायचे असेल आणि सर्वजण एकाच गाडीत नसतील तर मजा येत नाही. या करीता तुम्हाला मोठ्या गाडीची आवश्यकता असते. भारतीय बाजारपेठेत मोठ्या कुटुंबासाठी अनेक सात सीटर आणि आठ सीटर गाड्या उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सात सीटर किंवा आठ सीटर कार मोठ्या कुटुंबांसाठी लोकप्रिय पर्याय बनल्या आहेत. परंतु तुम्हाला याही पेक्षा मोठ्या गाड्यांची आवश्यकता असेल तर देशातील बाजारात दहा सीटर गाडीही उपलब्ध आहे. देशातील बाजारात दहा सीटर दाखल झाली असून या कारला ग्राहकांची पसंतीही मिळत आहे. चला तर जाणून घेऊया या कारच्या वैशिष्ट्यांबद्द
देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती. याला ‘Force Citiline’ असे नाव देण्यात आले आहे, जी कंपनीच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरची अद्ययावत आवृत्ती आहे. इंडियन ऑटो मेकर ब्रँड फोर्स मोटर्स भारतात सिटीलाईन नावाने या दहा सीटर कारची विक्री करते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
एमपीव्ही फोर्स सिटीलाईन आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिनने सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली एमपीव्हीमध्ये दहा लोक आरामात प्रवास करू शकतात. या गाडीचं डिझाईन ट्रॅक्स क्रुझरसारखं आहे. पण यात काही फरक असून सिटीलाइन ट्रॅक्सपेक्षा वेगळी ठरते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून पहा