सध्या महाराष्ट्र विविध विभागात अनेक पदे रिक्त आहे. यात एक महत्वाचा विभाग म्हणजे कृषी विभाग! या विभागात तब्बल ९ हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समजते. या मुळे या विभागातील भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याची मागणी सर्व स्तरावरून जोर पकडत आहे. यातच, कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोष दिला जात असताना, गेल्या काही वर्षांपासून तब्बल ९,१३३ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रिक्त पदांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने ही भरती कधी होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरी प्राप्त माहिती नुसार या विभाग भरती प्रक्रिया राज्य सरकार लवकरच राबू शकते असे संकेत आहे. कारण राज्यातील विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्या नुसार कृषी विभागाचा नंबर सुद्धा लवकरच लागू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध आस्थापनांमध्ये एकूण २७,५०२ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त १८,३६९ कर्मचारी कार्यरत असून, उर्वरित ९,१३३ पदे रिक्त आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात असलेल्या ‘गट-क’मधील सर्वाधिक ५,५६५ पदे रिक्त आहेत. यामध्ये कृषी पर्यवेक्षक (७३), कृषी सहायक (१,६९३), अधीक्षक (५८), लिपिक, टंकलेखक, अनुरेखक आणि वाहनचालक यांचा समावेश आहे. तसेच, ‘गट-ड’मध्ये नाईक, शिपाई (१,९८९), क्लीनर, माळी (५५९), प्रशिक्षित मजूर (२९९), मदतनीस आणि परिचर यांचीही वाणवा आहे.