Accident Viral Video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
इंदौर के विजयनगर क्षेत्र में रसोंमां चौराहे पर नैनो कार में सवार डॉक्टर ने गलती से ब्रेक की जगह एक्सीलेटर दबा दिया तेज गति से आगे खड़ी कर में घुस गई डॉक्टर की मौत हो गई pic.twitter.com/1ieYzr60NV
— SanjayGupta_Journalist (@sanjaygupta1304) November 21, 2024
अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये एका व्यक्तीने ब्रेकऐवजी चक्क ॲक्सिलेटर दाबला.. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. इंदूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. ज्यामध्ये सिग्नलवर कार थांबवण्याऐवजी कारमध्ये बसलेल्या डॉक्टरने चुकून एक्सलेटर दाबला आणि कार थेट समोरच्या कारला धडकली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्या गाडीला डॉक्टरांच्या गाडीची धडक बसली. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
या व्हिडिओचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वेगवान नॅनो कार येते आणि समोर उभ्या असलेल्या कारला धडकते. डॉक्टर मुकेश तिवारी असे मृत डॉक्टरचे नाव आहे.ते बीसीएम हाईट्समध्ये राहत होते आणि खाजगी प्रॅक्टिस करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी केस कापून ते घरी परतत होतेतेव्हा ही दुर्घटना घडली.
https://x.com/sanjaygupta1304/status/1859486594358546476?t=IiKhJmwRc8bdHQuhX_hfig&s=19