ADCC Bank Recruitment : नगर : जिल्हा सहकारी बँकेची भरती (ADCC Bank Recruitment) प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने आज पासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे. बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या (Pune) ठिकाणी ऑनलाइन (Online) सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंट पासून परीक्षार्थी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आह
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
७०० जागांसाठी आलेत सुमारे २८ हजार अर्ज
जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत. आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसापासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची देखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेत भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर भूमिकाच बँकेच्या वतीने मांडली असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी तरुण वर्ग सर्वांनीच प्रामाणिकपणे मोठे सहकार्य केले. म्हणूनच मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहेच परंतु जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचा पारदर्शक कारभार सुरू आहे. त्यामुळे होणारी भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी अभ्यासू हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा हिच माझी प्रामाणिक इच्छा आहे असेही कर्डीले म्हणाले.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा