विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने होऊन गेले पण अद्यापही लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढीव अनुदान कधी मिळणार? याकडे लाडकी बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. ७ मार्च २०२५ पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून १२ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. मात्र, फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यांत जमा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा