Bhoomi Land records
शेतकरी बांधवांसाठी आता अगदी सोपी पद्धत आलेले आहे ती म्हणजे तुम्हाला जमिनीची मोजणी करायचे असेल तर अगदी सोपी पद्धत शासनाने राबवली आहे.
ती म्हणजे आता फक्त तुम्हाला जमिनीचा गट नंबर टाकून संपूर्ण जमिनीच्या बायोडाटा हा काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर ओपन होणार आहे त्याला जाणून घेऊयात कसा करायचा ओपन मोबाईल वरती बायोडाटा.
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचा वाचा..
येत्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता, या जिल्ह्यांना दिला इशारा
आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा
प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जमिनीचा नकाशा कसा पाहायचा बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती..
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.Bhoomi Land records
असा चेक करा गट नंबर टाकून जमिनीचा संपूर्ण नकाशा..
👇👇👇👇