Cotton price
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. पहिल्याच माणसांच्या पावसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये अगदी चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून आली आहे.ती प्रतिक्विंटल किती रुपयाने वाढ झालेली आहे हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.. थेट सोन्याच्या भावात 4 हजार रुपयाने घट..
देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये केवळ वायद्यांमध्ये सुधारणा दिसत होती. पण कालपासून केवळ वायद्यांमध्येच नाही तर बाजार समित्यांमध्येही कापूस दरात सुधारणा दिसली. आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर 500 रुपयांनी वाढले होते. तर वायद्यांमधील वाढ १२४० रुपये होती
शुक्रवारी, म्हणजेच आठवड्याच्या शेवटी देशातील वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. शुक्रवारी जूनचे वायदे बंद झाले. ऑगस्ट महिन्याच्या डिलेव्हरीचे वायद्यामध्ये झालेली वाढ गेल्या काही महिन्यातील उचांकी होती.
काल एमसीएक्सवर ऑगस्टच्या वायद्यात १ हजार २४० रुपयांची वाढ झाली. एवढी वाढ एकाच दिवसात मागील अनेक महिन्यांमध्ये दिसली नाही.
शुक्रवारी वायदे ५७ हजार २६० रुपयांवर बंद झाले. एमसीएक्सवर खंडीमध्ये वायदे होतात. एक खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते.
देशातील वायद्यांमध्ये सुधारणा होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे जवळपास २ टक्क्यांनी वाढले होते. वायद्यांमध्ये दीड सेंटने वाढ झाली होती.. Cotton Price
या बाजार समितीत झाली चक्क 500 रुपयांनी कापसाच्या बाजारभावात वाढ..
👇👇👇
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..