Cotton Price | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापसाच्या दरात “इतक्या’ ने सुधारणा; दरात आणखी वाढ होणार आहे
- कापसाच्या भावात वाढ
कापसाची आयात आणि भाव वाढणार का?
Cotton Price | कापूस हे महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील विदर्भात कापूस लागवडीसाठी आवश्यक माती आणि वातावरण असल्याने शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन करतात. कापसाच्या दरात चढ-उतार होत असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.
कापूस पिकावर पहिली फवारणी कोणत्या औषधांनी करावी.?
आणि केव्हा करावी.? पहा पूर्ण माहिती
कापसाच्या भावात वाढ
कापूस खरेदी लिलावात परभणी, सेलू, मानवत बाजारपेठेत कापसाची आवक घटल्याने कापसाच्या दरात वाढ झाली आहे. या कापूस भावात 150 रुपयांवरून 450 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.तसेच हुमानत बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6000 ते कमाल 7415 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर, सेलू बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6250 ते कमाल 7410 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. तसेच परभणी बाजार समितीत कापसाला किमान ७ हजार ते कमाल ७ हजार ४३५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
कापसाची आयात आणि भाव वाढणार का?
दरम्यान, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी आहे. बाजारात कापसाची आवक कमी झाल्यामुळे कापसाच्या दरात ही वाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची आवक कमी झाल्यास सर्वत्र कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज कापूस तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.