E-Peek Pahani मोठी बातमी.!! खरीप हंगाम 2023 साठी ई-पिक पाहणी सुरू, पहा कशा पद्धतीने करायची ई-पीक पाहणी.
E-Peek Pahani 2.0.11 Application Download नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आज समोर घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो शेतकरी बांधवांना जर पंतप्रधान पिक विमा योजनेचा फायदा म्हणजेच लाभ घ्यायचा असेल तर त्यांना अगोदर ई पीक पाहणी करणे आवश्यक असणार आहे. याच ई-पिक पाहणीच्या संदर्भात सरकारकडून शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेले असून सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना शासनाने केलेली आहे. मित्रांनो पिक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ईपीक पाहणी एप्लीकेशन तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करायचे आहे. एप्लीकेशन डाउनलोड करण्याची लिंक आम्ही खाली केलेलीच आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.
ई-पीक पाहणी एप्लीकेशन 👉 इथे क्लिक करा.
मित्रांनो ई-पीक पाहणी एप्लीकेशन मोबाईलवर तुम्हाला डाऊनलोड करावे लागणार आहे. त्याची लिंक आम्ही दिलेलीच आहे पण मित्रांनो यावर्षी ई – पिक पाहणी एप्लीकेशन चे नवीन वर्जन आलेले आहे ते तुम्हाला इंस्टॉल करायचे आहे. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्याशिवाय तुम्हाला नवीन हंगामातील सातबारा दिसणार नाही तसेच पिक विमा योजनेचा लाभ देखील मिळणार आहे त्यामुळे हे ॲप्लिकेशन अगोदर तुम्हाला डाऊनलोड करावे लागणार आहे. मित्रांनो एप्लीकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर कशा पद्धतीने ई-पिक पाहणी तुम्हाला करावी लागणार आहे.? याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेलीच आहे ती वाचून घ्यावी.
👇👇👇👇👇
हे पण वाचा, हवामान विभागाने दिला गंभीर इशारा, या भागात पडणार अति मुसळधार पाऊस
ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करावी.? खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
1) सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ‘ई-पिक पाहणी’ व्हर्जन-2 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे.
2) ‘ई-पिक पाहणी’ ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी.
3) इतर नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस स्वतःचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करून गट क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी.
4) यानंतर, पुन्हा होम पेजवर येऊन स्वतःच्या शेतामधील पिकाची माहिती भरून खाते क्रमांक निवडावा.
5) पुढे गट क्रमांक निवडून जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे. याची माहिती भरून घ्यावी.
6) कोणत्या हंगामातील पीक आहे, कोणते पीक घेतलेले आहे आणि पिकाचा वर्ग कोणता आहे निवडावे. तसेच, एका पेक्षा जास्त पीक असेल तर बहुपीक पर्याय निवडावा.
7) यानंतर सिंचन पद्धत, लागवड केलेली दिनांक आणि स्वतःच्या जमिनीमध्ये उभे राहून आपल्या मोबाईल मध्ये असलेले जीपीएस ऑन करून शेतीचा फोटो काढून अपलोड करावा.