शेतकऱ्यांना घरासाठी ही बँक देणार 50 लाख कर्ज/Farmers Home Loan Scheme

शेतकऱ्यांना घरासाठी ही बँक देणार 50 लाख कर्ज/Farmers Home Loan Scheme
स्टार किसान घर योजना (Star Kisan Ghar Yojana)

मित्रहो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. पण या कृषिप्रधान देशांमध्ये अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही

हालाखीची आहे, त्यामुळे त्यांना आपले स्वतःचे घर बांधणे किंवा आहे ते घर दुरुस्त करणे देखील शक्य होत नाही.

ही बाब लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया या बँकेने ही स्टार किसान घर योजना (Star Kisan Ghar Yojana) सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी व घर दुरुस्त करण्यासाठी कमी व्याजदरासह 50 लाखापर्यंत

गृह कर्ज दिले जाते व कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला जातो.

गृह कर्ज (Home Loan) व्याज किती? व परतफेड करण्यासाठी मुदत किती?

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घर अथवा फार्महाउस बांधायचे आहे किंवा सध्या असलेल्या घराची दुरुस्ती करायची असल्यास त्यांना या ग्रह कर्जाचा लाभ मिळेल. नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 8.05 टक्के व्याज दराने 1 ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. तसेच कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना 15 वर्षापर्यंत मुदत दिली जाते.

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

बँक ऑफ इंडिया मध्ये KCC खाते असलेले, कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी या योजनेअंतर्गत या कर्जाचा लाभ घेऊ शकतात.

आईटी रिटर्न (IT Return) देण्याची आवश्यकता नाही.

 

Star Kisan Ghar Yojana

शेतकरी मित्रहो स्टार किसान घर योजना (Star Kisan Ghar Yojana) अंतर्गत गृह कर्ज घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन किंवा 18001031906 या टोल फ्री नंबर वरती कॉल करून आणखी सविस्तर माहिती घेऊ शकता.

तर शेतकऱ्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी ही योजना उपयुक्त वाटली असेल,तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करायला विसरू नका, धन्यवाद… 🙏

Back to top button
error: Content is protected !!