बापरे! दिवाळीआधीच फटाक्याच्या दुकानाला लागली भीषण आग, जीव मुठीत घेऊन माणसांची पळापळ !
video viral | बापरे! दिवाळीआधीच फटाक्याच्या दुकानाला लागली भीषण आग, जीव मुठीत घेऊन माणसांची पळापळ अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?
Fire breaks out at Cracker shop | दिवाळीच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हैदराबादमधील रामकोट येथील फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरातील अनेक दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पारस या फटाक्यांच्या घाऊक दुकानात ही घटना घडल्याचं समोर आलंय. घडलेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका दुकानात फटाके फुटतात आणि ग्राहक घाबरून पळून जातात. फटाके फुटायला लागल्यानंतर दुकानात जमलेला ग्राहकांच्या गर्दीचा लोंढा बाहेर येण्यासाठी धावत सुटतो. एकमेकांना धक्का देत सगळे बाहेर येतात. या दुर्घटनेमुळे संपूर्ण दुकानाला भीषण आग लागल्याचे आणि प्रचंड नुकसान झाल्याचे या व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो.
पाहा व्हिडिओ: