Girls Education राज्य शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75000 रुपये रोख रक्कम

Girls Education  राज्य शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75000 रुपये रोख रक्कम

Girls Education : महाराष्ट्र सरकारने 10 मार्च रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पांतर्गत सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली होती.या योजनेचे नाव लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojna) असे ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पात्र मुलींना महाराष्ट्र सरकार 75 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती.

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार मुली आणि महिलांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन सरकार राज्यातील मुली आणि महिलांच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर गरजांसाठी अनेक उपाययोजना राबवणार आहे.

जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा ?

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारने लेक लाडकी नावाची नवीन योजना आणल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.या योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर 5000 रुपये, इयत्ता 4000 रुपये, इयत्ता 6000 रुपये आणि इयत्ता 11वीमध्ये 8000 रुपये दिले जातील. लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पुढील अभ्यासासाठी 75,000 रुपये रोख दिले जातील Girls Education.

Back to top button
error: Content is protected !!