Heater shock video सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. कधी सार्वजानिक ठिकाणचे तर कधी घरातील व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एका घरातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबाने नातवाचा जीव वाचवला आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला खेळताना दिसेल. खेळत खेळत तो एका स्वीच बोर्डाकडे जातो आणि स्वीच बोर्डच्या खाली हिटर लावलेल्या बादलीला स्पर्श करतो. हे आजोबाला दिसताच आजोबा धावत येतात आणि त्या चिमुकल्याला उचलतात. या दरम्यान त्यांचा तोल जातो आणि ते चिमुकल्याला घेऊन खाली पडतात. त्यांचा पडण्याचा आवाज ऐकून चिमुकल्याचे आईवडील बाहेर येतात. चिमुकल्याची आई बाळाला उचलून कडेवर घेते त्यानंतर आजोबा चिमुकल्याच्या आईवडिलाना रागावताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या आजोबांची तळमळ पाहून कोणीही भावुक होईल. घरात वृद्ध लोक किंवा वडीलधारी लोक का असावेत, हे तुम्हाला या व्हिडीओवरून समजेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा