मोठी बातमी या लाडक्या बहिणींकडून होणार वसुली ! सरकार चा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana News:राज्य शासनाने सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम डावलून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले, त्यांच्याकडून लवकरच या पैशांची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांनां प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
परंतु या योजनेसाठी शासनाने काही अटी शर्ती टाकल्या होत्या. त्यात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, शिवाय ज्या महिलांचे वाय २१ ते ६५ आहे त्यात विधवा, परित्यक्ता, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना न्याय मिळावा म्हणून शासना- ची ही योजना आहे.
शिवाय ज्या महिला याआधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. असे असतांना असंख्य महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. सदर अर्ज शासकीय कर्मचाऱ्यांनी घाईगर्दीने मंजूर करुन त्या महिलांच्या बँक खात्यांवर पैसेही पाठवले.
आता शासनाचे डोळे उघडले असून त्यांनी या योजनेतील अर्जाची पुन्हा छाननी करुन ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा तसेच ज्या महिला अपात्र आहेत परंतु त्यांना चुकून पैसे चालल्या गेले आहेत अशा महिलांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून अर्जाची छाननी करण्याचे जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती, त्यांनी त्यात दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडलेला असून त्याला राज्यातील लाडक्या बहिणींचा काय दोष? असा संतप्त सवाल महिलांमधून उपस्थित होत आहे. तेव्हा शासनाने या पैशांची वसुली संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनच करावी, अशी महिलांची मागणी आहे.