केवळ 100 रुपयात होणार जमीन नावावर जाणून घ्या शासनाचा नवा कायदा
Land Records Today News नमस्कार मित्रांनो, यापूर्वी जर तुम्हाला जमीन नावावर करायची असेल तर 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च करावे लागत होते. पण आता, शासनाच्या नवीन नियमांनुसार, केवळ 100 रुपयांमध्ये कोणतीही जमीन एका दिवसात नावावर करता येऊ शकते.
शेतकरी बांधवांसाठी शेती हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. शेतीशी संबंधित अधिकार शासकीय महसूल विभागाकडे असतात.
शेतकरी बांधवांना शेती संदर्भातील अधिकार आणि नियमांची माहिती असल्यास त्यांना शेतीचे व्यवहार अधिक सोयीचे आणि सोपे होतात. याच दृष्टीने आपण जमिनीचे अधिकार, नियम आणि कागदपत्रांची माहिती जाणून घेऊ.
जुने सातबारा उतारे, जुने फेरफार आणि इतर जमीन संबंधित कागदपत्रे कशा पद्धतीने डाउनलोड करावीत, याची माहिती देखील आपण मिळवू शकतो.महाराष्ट्रात शेतजमिनीची वाटणी अवघ्या 100 रुपयांत करता येते, याची माहिती बऱ्याच जणांना नसते.
वारसा हक्काने मिळालेली जमीन स्वतःच्या नावावर करण्याची प्रक्रिया काही वेळा थोडी कठीण आणि खर्चिक ठरू शकते, यासाठी योग्य ती माहिती आणि मार्गदर्शन असणे गरजेचे आहे.
जर वारसांमध्ये सर्वांचे एकमत असेल आणि कोणताही वाद नसेल, तर केवळ १०० रुपयांच्या बाँड पेपरवर सर्व वारसांच्या सह्या घेऊन तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात जमिनीची वाटणीसाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्रातील जमीन नोंदीबाबत, जर आई-वडील जमिनीच्या वाटणीस तयार नसतील, तर काही विशिष्ट प्रक्रियेद्वारे अगदी शून्य रुपयांमध्ये जमीन तुमच्या नावावर करता येऊ शकते. याबाबत संपूर्ण शासन निर्णय तपासून पाहावा.
शेतीची वाटणी करण्यासाठी काही वेळेस दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. तुम्हाला माहितीच आहे की शासकीय कार्यालयांमध्ये नेहमीच गर्दी असते, त्यामुळे थोडी धावपळ होऊ शकते.
या वेळी, गर्दीमध्ये उभं राहून दुय्यम कार्यालयात नोंदणी केल्यानंतर, जमिनीचं वाटप किंवा हक्कसोड पत्र देऊन जमीन नावावर केली जाते.
शेतजमिनीचं वाटप तीन पद्धतींनी होऊ शकतं:
पहिली पद्धत म्हणजे दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप केल्यास, जमिनीची फोड म्हणजेच वाटणी होऊ शकते.
दुसरी पद्धत म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अनुसार तहसीलदार जमिनीचं वाटप करू शकतात.तिसरी पद्धत म्हणजे दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता, कलम ५४ अन्वये वाटणीचा दावा दाखल करून जमिनीचं वाटप होऊ शकतं.
वारसदारांनी सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज करावा. १०० रुपयांच्या बाँड पेपरशिवाय अन्य कोणतेही शुल्क न आकारता तहसीलदार हे काम करू शकतात.
जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार, सर्व वारसदारांची सहमती असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी एक नोटीस जारी केली जाते. जर सर्व वारसदारांची सहमती मिळाली, तर जमीन वाटपाचा आदेश दिला जातो आणि त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तलाठ्यांना दिली जाते.
आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पाच मिनिटांतच तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा पाहू शकता.