Maharashtra Rain Update :आज राज्यातील 23 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ! हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update :आज राज्यातील 23 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ! हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या राज्यातील तीन विभागांमध्ये अद्याप

समाधानकारक मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपातील पिके विस्कळीत झाली आहेत.

ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत, त्या भागात पावसाअभावी पिके करपली आहेत. अशा परिस्थितीत सर्वत्र मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आले आहे.

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, IMD ने आज राज्यातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

11जुलै रोजी महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती काय ??

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस..

 

कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.

IMD च्या मते, राज्यात पर्जन्यमान वाढवण्यासाठी अनुकूल हवामान तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आज ४ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

11जुलै रोजी महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती काय ??

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस..

 

कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल

आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पुणे जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

11जुलै रोजी महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती काय ??

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस..

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!