दिवाळीत या लोकांना मोफत एसटी प्रवास मिळणार ! महामंडळाची मोठी घोषणा
MSRTC Free Traveling:एसटी म्हणजे बस चं आकर्षण आजही जसाच्या तसचं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या घरापुढे मोठमोठ्या करोडो रुपयांच्या कार असतील तरी गरिबाची बस म्हणजेच आपली लाल परी आजही आकर्षण तसेच ठेवून आहे.
यामुळे एसटी महामंडळाने मोठी घोषणा केलेली आहे. दिवाळीमध्ये याचा लाभ जो आहे तो प्रवाशांना भेटणार आहे. प्रवाशांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. आणि यामध्ये कोणते प्रवासी असणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे. महिलांसाठी यामध्ये खास विषय सूट देण्यात आलेली आहे.
जेव्हा कुठल्याही पद्धतीचा प्रवास करण्यासाठी वाहन उपलब्ध नव्हतं तेव्हापासून महाराष्ट्र सरकारची एसटी महामंडळाची ही बस ग्रामीण भागासह शहरांमध्ये अजून पर्यंत सुसाट वेगाने धावत आहे. दाखवण्याचे ते दिवस आजही आपल्याला आठवत असतील म्हणून एसटीने प्रवाशांसाठी चांगली सुविधा देण्यासाठी कंबर कसली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यामध्ये आता 2400 साध्या डिझेल बस पैकी पहिली बस रविवारी दापोडी मध्ये दाखल झालेली आहे. 50 बस अजून दाखल होणार आहे. दिवाळीमध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रवास होत असल्यामुळे दिवाळीमध्ये लाल परी च्या फि-या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालघर विभागातील आठ आगारातून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर च्या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मोठी बातमी राज्यात जोरदार गारपिट आणि पावसाची शक्यता
राज्य मार्ग व परिवहन मंडळाच्या सर्व बसमध्ये महिलांना सन्मान योजने अंतर्गत फक्त अर्धे भाडे लागणार आहे. ज्याला आपण हाफ तिटीक म्हणतो. त्याचबरोबर 75 वर्षे वरील जे लोकांना मोफत प्रवास दिला जात आहे. विद्यार्थ्यांना सुट्टीत आपल्या गावी घरी जाण्याकरिता व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी ५० टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये नोव्हेंबर पर्यंत दीडशे ते तीनशे बस दाखल होतील असं नियोजन आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या या सर्व बसची चाचणी अशोक लेलँड कंपनीच्या कारखान्यात घेण्यात आलेली आहे.
दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यान अनेक ठिकाणी बस धावणार आहे. त्यामध्ये जर आपण पाहिला गेला तर 250 ते 300 बस पुण्यातून धावणार आहेत. बीड, लातूर, नाशिक, आणि अकोले येथून जादा बसेस मागवले आहेत. दिवाळीनिमित्त पुण्याहून घरी जाण्यासाठी प्रचंड गर्दी असल्यामुळे जास्त गाड्या मागविण्यात आल्या आहेत.
यामुळे प्रवाशांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. आता पुणे विभागातून दररोज 450 एसटी दिवाळीच्या दरम्यान धावणार आहे.