Namo Shetkari Sanman : ‘नमो शेतकरी सन्मान’चा पहिला हप्ता कधी जमा होणार? कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश

Namo Shetkari Sanman : ‘नमो शेतकरी सन्मान’चा पहिला हप्ता कधी जमा होणार? कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश

Namo Shetkari Sanman : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली.

Agriculture News : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर केली. मात्र अद्यापही पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. या संदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश दिले.

👇👇👇👇

शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार रुपये इथे बघा कोण कोणते शेतकरी असणार पात्र

 

या संदर्भात कृषीमंत्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन 2023-24 च्या पुरवणी मागण्यांमध्ये 2000 कोटी रुपयांचा

निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वाटला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता तातडीने मिळणे गरजेचे आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

नमो महा सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्धपातळीवर करावेत, असे निर्देश कृषिमंत्री मुंडे यांनी दिले.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार असल्याने त्यामध्ये या योजनेची नोंदणी करण्यात आली आहे. PMKisan योजनेप्रमाणे, MahaIT कडून MahaDBT पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मॉड्यूल विकसित करण्याचे काम सुरू आहे.

👇👇👇👇

farmer loan :तुम्हाला माहित आहे का ? एक एकर जमिनीवर किती कर्ज मिळते ? पहा काय आहे मर्यादा आणि कर्ज मिळवण्याच्या पद्धती

P. F. M. S. यावेळी कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, यंत्रणेतील तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी विभागासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!