- PM Kisan Registration नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. पी एम किसान योजनेची नवीन कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परंतु आपल्या मधील बरेच शेतकरी बांधवांना पीएम किसान चे हप्ते येत नाहीत त्यासाठी काय करायचे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
तर शेतकरी बांधवांनो नव्याने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकरी बांधवांना पूर्वी पीएम किसान चा हप्ता यायचा परंतु अचानक हप्ते बंद झाले. अशा शेतकरी बांधवांना आता नवीन साईट वरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे याबाबत शासन निर्णय देखील आला आहे. त्यामुळे आज आपण नवीन नोंदणी कशी करायची त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगायचे म्हटले तर आता नव्याने पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.दरवर्षी 12 हजार रुपये मिळण्याची सुवर्णसंधी शेतकरी बांधवांना चालून आलेली आहे. याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि शेतकरी महासंघ या दोन योजनेचे मिळून दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.
पी एम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी काय पात्रता आहे..
Pm Kisan Registration किसान आणि शेतकरी महा सन्मान योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावर जमीन असणे बंधनकारक आहे.
तसेच शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा नावावर जमीन आहे अशा शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी.
त्यासाठी मित्रांनो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे.? आणि कुठे शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे.? त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Pm Kisan किसान साठी नोंदणी कशी करायची..??
PM Kisan योजनेसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करायला 3 पर्याय उपलब्ध आहेत यातील कोणताही पर्याय वापरून शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतात.
- 1. पी एम किसान साठी शेतकरी बांधवांकडे सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपल्या तलाठी सज्जा मते जाऊन आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स जमा करायचे आहेत – परंतु यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे.
- 2. शेतकऱ्यांसाठी दुसरा पर्याय म्हणजे आपले जवळील सेतू सुविधा केंद्र CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरवर ही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतात. परंतु यासाठी शेतकरी बांधवांना ठराविक शुल्क म्हणजे काही पैसे द्यावे लागतील.
- 3. तिसरा आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे स्वतः ऑनलाईन नोंदणी करणे. यासाठी शेतकरी बांधवांना कोठेही द्यायची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही.
- स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
मोबाईल वरून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Pm Kisan New Registration योजनेसाठी मोबाईल वरून ऑनलाईन नोंदणी कशी करायची..
Pm Kisan Registration ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान चे दरवर्षी 6000 हजार रुपये मिळतात त्या शेतकरी बांधवांना ऑटोमॅटिक शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 06 हजार रुपये देखील मिळणार आहेत.त्यासाठी शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे..
- मोबाईल वरून नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- पी एम किसान चा अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. निवडल्यानंतर कॅपच्या कोड भरून तुम्हाला गेट ओटीपी Get OTP या बटणावर क्लिक करायचे आहे.
- ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून परत एकदा कॅपच्या कोड भरायचा आहे आणि सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे तुमची नोंदणी होईल डॅशबोर्ड वरती लॉगिन करून तुम्हाला अजून बरीच काही माहिती भरायची आहे यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक जमिनीचा गट नंबर, सातबारा आठ अशा विविध कागदपत्रांची तुम्हाला गरज लागणार आहे. दिलेली सर्व रकान्यामध्ये योग्य माहिती भरायची नोंदणी करताना तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रकारे इंग्रजी मध्ये नाव आहे त्या प्रकारे तुमचे नाव भरायचे आहे. नावात काही चूक झाल्यास तुमचे अर्ज पूर्ण होणार नाही.Pm Kisan Registration
तुमच्या समोर उघडलेल्या पानावरती तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव या सर्व गोष्टीची काळजीपूर्वक माहिती भरायची आहे तसेच वैयक्तिक माहिती मध्ये तुमचा नाव पत्ता हा सर्व व्यवस्थित रित्या भरून घ्यायचा आहे.
बँक डिटेल मध्ये तुमचा खाते क्रमांक बँकेचे नाव आयएफसी IFSC कोड वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक करायची आहे.
ही सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट या बटणावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून पहा म्हणजे भविष्यात तुम्हाला तुमचे स्टेटस पाहण्यासाठी या नंबरची गरज लागेल..
PM Kisan Registration हप्ता जमा झाला की नाही हे कसे पाहायचे..??
तुमच्या खात्यात PM-Kisan चा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.
ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.
या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.
आतापर्यंत PM-Kisanचे 9 हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.
गाय म्हैस साठी मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
