राज्यात वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. तसेच, कमी पोलिस कर्मचारी असल्यामुळे तपासात विलंब होतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर १० हजार पोलिसांची भरती होणार आहे. गृह विभागाने पावसाळ्यापूर्वी भरती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांकडून मागवली आहे. यासाठी रिक्त पदांची बिंदुनामावली अद्ययावत करून ती गृह विभागाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
गुन्ह्यांमध्ये वाढ
दरवर्षी राज्यात सरासरी १० ते १५ टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, पोलिस कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे तपासावर ताण येतो आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल.
नवीन पोलिस ठाण्यांची गरज
राज्यात सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा यांसारख्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढत आहे. अनेक उद्योजकांना खंडणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, काही ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा