Post Office च्या ह्या स्कीम मध्ये 5 वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील 12, 30,000
Post Office Scheme च्या ह्या स्कीम मध्ये 5 वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील 12, 30,000 कर सवलती या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळतो.
निवृत्तीनंतर उत्पन्नाचा अभाव
निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठांकडे उत्पन्नाचे ठोस स्रोत नसतात. त्यांच्या हातात एकच फंड असतो, जो त्यांनी रिटायरमेंटसाठी साठवलेला असतो. हा फंड ते आपल्यासाठी आवश्यक तसा वापरू शकतात.
Senior Citizens Savings Scheme बद्दल माहिती
भविष्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे असते. निवृत्तीनंतर ज्येष्ठ लोकांकडे उत्पन्नाचे ठरलेले स्रोत नसल्यामुळे त्यांना सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या योजना महत्त्वाच्या वाटतात. अशा परिस्थितीत, ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम ही एक चांगली योजना आहे.
राज्यातील सर्व शाळांना 14 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर ! या तारखेला पुन्हा शाळा सुरू
योजनेची वैशिष्ट्ये
ज्येष्ठ नागरिक या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सध्या या योजनेवर 8.2% दराने व्याज मिळत आहे. उदाहरणार्थ, 30 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांत 12.30 लाख रुपयांचे व्याज मिळेल.
तिमाही व्याजाचे फायदे
या योजनेत तिमाही आधारावर व्याज मिळते. उदाहरणार्थ, 30 लाख रुपयांवर तुम्हाला प्रत्येक तिमाहीला 61,500 रुपये मिळतील. 5 वर्षांनी मॅच्युरिटीवर एकूण 42.30 लाख रुपये मिळतील.
किमान गुंतवणूक 15 लाख असेल तर
जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांत 6,15,000 रुपयांचे व्याज मिळेल, आणि मॅच्युरिटीवर एकूण 21,15,000 रुपये मिळतील.
गुंतवणूक करणारे पात्र नागरिक
60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी ही योजना आहे. काही अटींसह, व्हीआरएस घेणारे सरकारी कर्मचारी आणि निवृत्त सैनिक देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
मॅच्युरिटी कालावधी वाढवण्याचा पर्याय
5 वर्षांनंतर या योजनेचा कालावधी 3 वर्षांसाठी वाढवता येतो. या विस्तारलेल्या कालावधीतही तुम्हाला व्याज मिळत राहील.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा