Rain in Maharashtra : राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढलेले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. चला तर जाणून घेऊया नवीन अंदाज.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. अचानक राज्यातून थंडी गायब झाल्याने शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढलेले आहेत. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतामध्ये सध्या गहू, हरभरा यासारख्या पीक सध्या बहुरू लागलेले आहे. तसेच सध्या पाऊस झाल्याने बागायती पिकांना मोठा फटका बसू शकतो. याचा परिणाम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे झालेला आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरी दिसून आलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या या चक्रीवादळामुळे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने राज्यामध्ये शनिवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आणखी सात डिसेंबर पर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण राहणार असे मत हवामान खात्यांनी वर्तवलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांमध्ये अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून पाहा आजचा हवामान आंदाज
Rain in Maharashtra तसेच सोमवारपासून म्हणजे आठ डिसेंबर पासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निवळून हळूहळू थंडीला सुरुवात होणार आहे. तसेच पुढील पाच दिवस मुंबई कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे 29 जिल्ह्यांमध्ये तापमान हे पुन्हा 12 डिग्री ते 12 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरू शकते, असं ही हवामान खात्याने सांगितले आहे. आता हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरतो हे आता पाहण्यासारखे राहणार आहे.