Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये व्यस्त होती, यावेळी समोरून एक भरधाव कार आली अन् तिला थेट उडवले. पण, या भीषण अपघातानंतर तरुणीने मात्र असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
अपघाताची ही घटना सिंगापूरमधील ऑर्चर्ड रोडवरील असल्याचे सांगितले जात आहे. यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये इतकी मग्न होती की, तिने रस्त्यावरील रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केलं आणि चालत सुटली, इतक्यात समोरून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. हे संपूर्ण दृश्य कारमध्ये बसवण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाले आहे, ज्याचा व्हि़डीओ सध्या खूप व्हायरल होतोय.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावरून चालताना तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग आहे की, तिने रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्ता ओलांडू लागली. इतक्यात सिग्नल ग्रीन झाल्याने वेगाने येणाऱ्या कारने तरुणीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली; यावेळी तिच्या हातातील मोबाइलदेखील दूर फेकला गेला. या घटनेनंतर कारचालकाने कार थांबवली आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी पटकन कारमधून बाहेर पडला. इतक्यात तरुणी उठून बसली आणि ती कुठे लागलय हे पाहण्याऐवजी आधी मोबाइल तुटला तर नाही ना हे पाहू लागते. त्यामुळे अनेक जण हा व्हिडीओ पाहून लोकांना जीवापेक्षा मोबाइल महत्त्वाचाआहे असे म्हणत आहेत.
https://twitter.com/i/status/1856773366721503540