ट्रेंडिंग

राज्यातील शाळा 1 एप्रिल पासून सुरू होणार ! वार्षिक वेळापत्रकात मोठा बदल

School new schedule:राज्यातील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम तक्ता प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात ‘सीबीएसई’नुसार शाळांचे वार्षिक वेळापत्रक काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य करण्यात आली असून लवकरच राज्यातील सर्व शाळांमध्ये १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये लवकरच CBSE आधारित अभ्यासक्रम लागू केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती.

त्यामुळे माध्यमिक शाळांचे वार्षिक वेळापत्रक सीबीएसई शाळांनुसार पाळण्याची शिफारस करण्यात आली असून नवीन राज्य अभ्यासक्रम सुचवण्यात आला आहे. किंवा शिफारशीबाबत राज्य शिक्षक व मुख्याध्यापक संघटना नोंदणी करून कारवाई करण्याची शक्यता आहे.

या आहेत शिफारशी

नवीन शैक्षणिक वर्ष १ एप्रिलला सुरू, ३१ मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालाने समाप्त

मे हा एक महिना उन्हाळी सुट्टी

एक जूनपासून पुन्हा शाळा सुरू

खूप दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवणे

सुट्ट्या कमी का करणार?

सीबीएसईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते साडेसहा तास होणे आवश्यक आहेत. सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे. त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत आहे. यामुळेच सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!