या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ ! सरकारचा मोठा निर्णय
State employee salary increase:कोतवालांच्या मानधनात वाढ करणेबाबत.संदर्भ क्र.३ येथील दि.६.४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकूण १२,७९३ कोतवालांना दरमहा रू.१५,०००/- इतके मानधन दि.१.४.२०२३ पासून लागू करण्यात आले आहे. राज्यातील कोतवालांनी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री महोदय व मा. लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये त्यांची प्रमुख मागणी ही चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करण्याबाबतची आहे.
याबाबत, कोतवालांना चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि.३.७.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निदेशानुसार अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीची गुरुवार, दि.२९.८.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत समितीने केलेल्या शिफारशींनुसार व मा. मंत्रिमंडळाने दि.३०.९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय :-
राज्यातील एकूण १२७९३ कोतवालांना संदर्भाधिन क्र.३ येथील दि.६.४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून सध्या लागू असलेल्या दरमहा रु. १५,०००/- इतक्या मानधनामध्ये दि. १.४.२०२६ रोजीपासून १० टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
त्यानंतर दर ३ वर्षांनी दि.१ एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये १० टक्के इतकी वाढ देण्यासही या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.२. तसेच, संदर्भ क्र.१ व संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र.३, ४ व ५ मधील तरतूदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतूदी जशाच्या तशा लागू राहतील.३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४२४/२०२४/व्यय-९, दि.२०.९.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१००७१५४९१९३२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने