ट्रेनच्या चाकांखाली लपून २५० किमी फरफटत धोकादायक प्रवास; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल

 

train viral video भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरले आहे तरीही प्रवाशांसाठी ही सेवा अपुरीच पडत आहे. आजही अनेक प्रवासीजीव मुठीत घेऊन रेल्वेने धोकादायकरित्या प्रवास करताना दिसतात. कधी खचाखच गर्दीने भरलेल्या डब्यांमध्ये घुसतात, तर कधी दरवाज्यामध्ये लटकून प्रवास करतात. काही लोकांना तर जीवाची अजिबात पर्वा नसते त्यामुळे रेल्वेच्या छतावर, तर रेल्वेच्या डब्यांच्यामध्ये उभे राहून प्रवास करताना दिसतात.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

दरम्यान अशाच धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे कारण अशा पद्धतीने कोणी प्रवास करू शकते यावर त्यांना विश्वास बसत नाही. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे,जबलपूर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक तरुण ट्रेनखाली चाकांच्यामधोमध बसून धोकादायकरित्या प्रवास करत आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या चाकांच्यामध्ये नियमित अंडर कॅरेजच्यातपासणीदरम्यान हा माणूस आढळून आला.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!