घराचं छप्पर तोडून ८० किलोचा अजगर सोफ्यावर पडला १५ सेकंदाचा थरार !

 

 

 

Viral video 80 किलोचा अजगर घरात शिरला तर काय होईल? विचार करवत नाहीये ना तर मलेशियातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तीन मीटरपेक्षा जास्त लांबीचा अजगर घराचं छप्पर फाडून थेट सोफ्यावर पडला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

घरात साधं झुरळ आणि पाल दिसलं तरी कित्येक महिला आणि मुलीं बघूनच घाबरतात. अश्यातच तुम्ही विचार करा की तुम्ही सोप्यावर बसून आवडीचा सिनेमा किंवा सिरीयल बघत आहात. त्यात अचानक घराचं छप्पर फाडून भला मोठा महाकाय अजगर तुमच्या अंगावर पडला तर…… तुम्ही काय कराल? साहजिकच अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या अंगाचा थरकाप उडेल. घसा कोरडा पडेल. असाच काहीसा प्रकार मलेशियातील कामुंटिंग मधील कंपुंग डू येथे एका कुटुंबासोबत घडला आहे. यात घरातील सर्व सदस्य हॉलमधील सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते आणि अचानक तीन मीटरपेक्षा जास्त लांब आणि सुमारे ८० किलो वजनाचा महाकाय अजगर छत तोडून त्यांच्यावर पडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!