Viral video of girl abusing auto driver : एका धक्कादायक घटनेत उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रिक्षाचालकाने एका तरुणीकडून भाडे मागितल्यानंतर तिने त्याला शिवीगाळ करीत क्रूरपणे मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ती मुलगी रिक्षाचालकाच्या कानाखाली मारत आहे, तसेच रिक्षाच्या आत आणि बाहेर ढकलून त्याला शिवीगाळीसह मारहाण करीत आहे. या वादाच्या वेळी रिक्षाचालक हात जोडून माफी मागतानादेखील दिसला.
तरुणीची दादागिरीकटरा पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरात भरदिवसा ही घटना घडली. त्या तरुणीची हात जोडून माफी मागत चालकाने सोडण्यास सांगितले असतानाही तिने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. ती थांबली नाही आणि त्याला मारहाण करत राहिली. तिने या संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग केले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, जो पटकन व्हायरल झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अहवालानुसार, त्या तरुणीने रस्त्याच्या मधोमध हे सगळे केले. कारण- रिक्षाचालकाने तिच्याकडे रिक्षाप्रवासाचे भाडे मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार देत रिक्षाचालकाला जमावासमोर बेदम मारहाण केली आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा