सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर झाले आहेत मात्र सध्या एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ इथे व्हायरल होत आहे. यामध्ये एका अजगराने माकडाला आपल्या विळख्यात अडकवून त्याची थरारक पद्धतीने शिकार केल्याचे दिसून येत आहे. आपला जीव धोक्यात असल्याचे पाहून माकड ओरडू लागतो यावेळी त्याचे डोळे त्याचा मृत्यू पाहत असल्याचे वाटू लागते आणि हे सर्व दृश्य अचानक भयानक रूप घेते. अजगराच्या या जीवघेण्या शिकारीचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून यातील माकडाची अवस्था पाहून आत लोक यावर हळहळ व्यक्त करत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओत दिसते की, अजगराने माकडाला वळसा घातला आहे. अजगराने माकडाला आपली शिकार बनवण्यास सुरुवात केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संधीचा फायदा घेत अजगराने माकडाला पकडून आपल्या ताकदीने घट्ट पकडले. अजगराने अशाप्रकारे माकडाला जकडून ठेवले की त्याला जागेवरून हलताच आले नाही. या वेळी माकड हतबल होऊन आपले डोळे मोठे करत मदतीच्या आशेने ओरडत राहतो. वन्य प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ जीवनाचे अथवा प्राण्यांच्या शिकारीचे कटू सत्य सांगून जातो. एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचे मरणे हे निश्चितच असते मात्र असे हे हृदयस्पर्शी व्हिडिओज अनेकदा मनाला चिरून जातात.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा अजगराने माकडाला पकडले तेव्हा माकड वेदनेने रडायला लागले आणि मदतीसाठी याचना करू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत राहिला, पण अजगराच्या सामर्थ्यासमोर त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. माकडाची अवस्था पाहून त्याला भीती आणि वेदना होत असल्याचे स्पष्ट होते. हे दृश्य अत्यंत भितीदायक होते, कारण अजगराची पकड इतकी मजबूत होती की माकडाला पळून जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. या व्हिडिओमध्ये माकडाचे पुढे काय झाले हा एक मोठा प्रश्न उरतो. त्यानंतरच्या घडामोडी व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांची चिंता आणखी वाढली आहे. अजगराने माकडाला आपले भक्ष्य बनवले की माकडाने आपला जीव वाचवण्यासाठी कसा तरी पलायन केले, हे गूढ कायम आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा