जालन्यात एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वतःला जाळून घेतल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखणी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेतल्याची घटना घडली आहे. प्रल्हाद भगस असं स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. प्रल्हादने शनिवारी रात्री १० च्या सुमारास जालन्यातील वाटुर फाटा येथे ही घटना घडली आहे.
प्रल्हादने रस्त्यावर पळत असताना स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी भडका उडला. काही तरुणांनी धावत प्रल्हादला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठीइथे क्लिक करा