शाळेच्या वर्गातच चक्कर येऊन बेंचवरून पडून सहावीतील मुलीचा मृत्यू, VIDEO

 

 

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत 6 वी मध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी शाळेत गेल्यानंतर ती चक्कर येऊन खाली पडली, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून दिव्या त्रिपाठी असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेमध्ये अचानक चक्कर आल्याने ती बेंचवरून खाली पडली. यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही.

 

दरम्यान, या घटनेनंतर मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे. तसेच पोलिसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, हसत्या खेळत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!