काळजाचा ठोका चुकवणारी एक थरारक घटना घडली. एका तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुरडा
सुदैवाने, भावेश म्हात्रे या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या चिमुरड्याचे प्राण वाचले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद ( आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी, २५ जानेवारी रोजी दुपारी १.४९ वाजता गावदेवी मंदिराजवळील अनुराज हाईट्स टॉवर (Anuraj Heights Tower) या इमारतीत ही घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्याचवेळी इमारतीतून बाहेर पडणाऱ्या भावेश म्हात्रे या तरुणाने हे दृश्य पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने चिमुरड्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.
प्रसंगावधान आणि धाडसामुळे वाचला जीव :
भावेशने आपल्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला चिमुरड्याला पूर्णपणे झेलता आले नाही. परंतु, चिमुरडा भावेशच्या हाताला लागून खाली पडल्याने त्याचा जमिनीवर पडण्याचा वेग कमी झाला आणि मोठी दुखापत टळली. या चिमुरड्याला किरकोळ खरचटण्यापलीकडे काहीही झाले नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या घटनेनंतर “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय आला. भावेशच्या या धाडसामुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार :
ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भावेशने दाखवलेले प्रसंगावधान आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे. त्याच्या या कृतीमुळे एका चिमुकल्याचे प्राण वाचले आणि एका कुटुंबावर कोसळणारा दुःखाचा डोंगर टळला.
व्हिडिओपाहण्यासाठी इथे क्लिक करा