लग्नाच्या (wedding) वेळी वधू (The bride) आणि वर (The Groom) खूप भावूक झालेले पाहायला मिळतात. बऱ्याचदा मुली लग्नात रडताना पाहायला मिळतात. त्यांना आपल्या कुटुंबाला सोडून जाण्याचं दु:ख असतं. पण नवरा मुलगा रडत असल्याचं फार कमी वेळा बघायला मिळतं. सध्या नवरामुलगा रडत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. व्हिडिओमध्ये वधू आणि वर मंडपात बसले आहेत आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. मग वर काहीतरी विचार करून भावूक होतो आणि सगळ्यांसमोर रडायला लागतो. त्याला रडताना पाहून वधूही भावूक होते, पण त्याच्याकडे पाहून हळूच हसते. शेवटी वर वधूचे चुंबन घेतो आणि आनंदी जीवनाची सुरूवात होते. वेडिंगवर्ल्डपेज नावाच्या एका वेडिंग पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा