12 th board exam video महाराष्ट्रामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे सध्या पेपर्स सुरू आहेत. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये राहणाऱ्या रूपाली खाडे या विद्यार्थिनीने सर्व दु:ख मागे सारून आपल्या शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. सध्या रूपाली खाडे बारावीचं शिक्षण घेतेय. बारावीच्या पेपरच्या पाच दिवस आधी आईचं निधन झालं आणि वडीलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही या मुलीने बारावीचा पहिला पेपर दिला आहे. सध्या या तरूणीच्या जिद्दीचे शिवाय तिच्या धाडसाचेही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. ऐन पेपरच्याच वेळी रूपालीच्या समोर अनेक आव्हानांचे डोंगर समोर आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये राहणारी रूपाली खाडे यंदा बारावीला आहे. बारावीचे पेपर 10 फेब्रुवारी पासून सुरू झाले आहेत. पेपर सुरू असतानाच रूपालीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 12 फेब्रुवारी रोजी रूपालीची आई छाया दीपक खाडे (38) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. पत्नीला शॉक लागल्यामुळे वाचवायला गेलेल दीपक खाडे मोठ्या प्रमाणावर भाजले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या सिन्नर तालुक्यातील एका खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पेपर सुरू असताना आईचं निधन आणि एका बाजूला वडीलांवर रूग्णालयात उपचार सुरू असताना या मुलीने अनेक आव्हानांचं ओझं डोक्यावर घेत पेपर दिला.
ऐन बारावीच्या पेपरच्या वेळीच रूपालीसोबत इतकी वाईट घटना घडल्यामुळे पंचक्रोशीतून त्या मुलीला धीर दिला जात आहे. सध्या तिच्या वडीलांवर सिन्नर तालुक्यातील एका खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या तिच्या वडीलांच्या तब्येतीची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. माध्यमिक लोक शिक्षण संस्थेमध्ये बोर्डाच्या पेपरसाठी या विद्यार्थिनीचा नंबर आला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी तिला धीर देत पेपर लिहिण्याचे आवाहन केले आहे. रूपाली कोणत्या शाखेमध्ये शिक्षण घेतेय, याची सुद्धा माहिती समोर आलेली नाही. रूपालीला नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आणि शेजारील गावातील नागरिकांनीही तिला धीर देत पेपर देण्याचे आवाहन केलं आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा