52 Ghonus snakes सध्या सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यापैकी काही तर अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांनी नेहमी सतर्क राहावे, असा सल्ला दिला जातो, कारण चिखलात काहीही लपलेले असण्याची शक्यता असते. असेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे, जिथे एका शेतात तब्बल 52 अतिविषारी घोणस सापांची पिल्ले एकाच वेळी आढळून आली. हा थरारक व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकरी असणे सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतात कष्ट करतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करावे लागते, तर कधी शेतात लपलेल्या सापांपासून स्वतःचा जीव वाचवावा लागतो. सध्या शेते हिरवीगार झाली असली तरी विंचू, काटे आणि शेतात लपलेल्या सापांपासून स्वतःचा जीव वाचवणे हे मोठे कठीण काम आहे. अशा परिस्थितीत, उतरत्या छपरांच्या खाली किंवा अडगळीच्या जागेत लपून बसलेल्या सापांचा धोकाही वाढला आहे. यामुळे, शेतात किती जपून पाऊल टाकावे लागते, याची कल्पना येऊ शकते!
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा