प्रशासनासह पोलिस यंत्रणेच दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांची तब्बल २०४८ पदे पश्चिम विदर्भात रिक्त आहेत. एकूण मंजूर ५७९८ पदांच्या तुलनेत ३६ टक्के पदे रिक्त असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. गावात एखादी संशयास्पद व्यक्ती आल्यास पोलिसांना तत्काळ कळवणे, चौरी, मारामारी, खून, दंगल यासारख्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे, पूर,
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पूर्णवेळ प्रशासन व पोलिसांना सहकार्य करीत असल्याने गावपातळीवरचे हे महत्त्वाचे पद आहे, तरीही या पदाच्या नियुक्तीसाठी प्रशासनात दिरंगाई होत असल्याचा पोलिस पाटील संघटनेचा आरोप आहे. पोलिस पाटील हा ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित म घटक व शासन आणि पोलिस T (・) यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. गावातील कायदा-सुव्यवस्था राखणे सोबतच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणे, अनुचित प्रकारांबाबत पोलिस ठाण्याला माहिती देणे यासह अन्य कर्तव्य पोलिस पाटील वेळोवेळी पार पाडतात. पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यात यावी, मानधनवाढ, यासह अन्य मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संघटनेद्वारा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यातील ११३४ पोलिस पाटलांवर २०४० गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २७लाख लोकसंख्येत ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता या ठिकाणी ११३४ पोलिस पाटील अपुरे आहेत. प्रत्येक गावाला किमान एक पोलिस पाटील गरजेचा आहे. निर्धारित मनुष्यबळानुसार जिल्ह्यात ३३६ पोलिस पाटलांची पदे अजून रिक्त आहेत. एकाच पोलिस पाटलाकडे मोठ्या जबाबदाऱ्या सांभतारेवरची कसरत होते. गावपातळीवरील T अंमलबजावणीसाठी पोलिस पाटील पद भरणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पावले उचलावीत म्हणून आता पोलिस पाटील संघटना आग्रही आहे. गत अनेक वर्षांपासून पोलिस पाटलांचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नाकडे संघटनेकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. या प्रश्नाची सोडवणूक झाली तर गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासह अनेक प्रश्न निकाली निघतील. याशिवाय प्रत्येक ठिकाणी शांतता अबाधित राहण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा