माझा नवराच कधी माझा नाही झाला’ RECORDING VIRAL वैष्णवी हगवणे प्रकरण

 

 

 

Vaishnavi Agawane : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याच वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

तू फालतू तू घणेरडी आहे

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लग्न करून मी चूक केली, असं वैष्णवी म्हणताना दिसत आहे. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती,” असं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

मी त्या माणसाला घटस्फोट देणार

तसेच, मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे, असंही वैष्णवीच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!