bhrti जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” या संवर्गासाठी एक रिक्त पद भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून संपूर्ण अर्ज A-4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर टंकलिखित किंवा स्वहस्ताक्षरित स्वरूपात भरावा.perience in
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा पदव्युत्तर पदवी (सामाजिक शाखा किंवा आपत्ती व्यवस्थापन) धारक असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास दरमहा रु. ४५,०००/- इतके मानधन देण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २३ मे २०२५ पासून ते ०५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचतील अशा प्रकारे सादर करावेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड – ४३११२२. अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करता येईल. सुटीचे दिवस वगळता अर्ज कार्यालयीन वेळेतच स्वीकारले जातील.