सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना, त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. सुरेश अर्दाड असे या तरुणाचे नाव आहे. वाळू माफियांना, सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. त्यामुळेच गावातील काही तरुणांनी त्याचे अपहरण केले. नंतर विदर्भात त्याचा मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना, त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. गावकऱ्यांचेही डोळे पाणावले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी गावकऱ्यांना दिले आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा आणि गुन्हेगारीगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा