School Holiday Announcement:दिनांक 08 व 09 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी दिनांक 08 व 09 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करणार आहेत.
यांमध्ये राज्य सरकारने दिनांक 14.10.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित तसेच अंशत : अनुदानित शाळांना निधीची तरतुद करण्यात आलेली नाही.
महत्वाची अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच सदर अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात यावा , यासाठी दि. 01 ऑगस्ट 2024 पासुन राज्यांमध्ये सलग 75 दिवस राज्यातील जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केले गेले आहेत.
या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ मिटींगमध्ये राज्यातील अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्याचे कबुल केले होते.