महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा! IMD चा 9 जुलैपर्यंत अलर्ट, वादळी वाऱ्यांची शक्यता
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आणि सक्रिय झालेल्या मान्सून प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आजपासूनच तळ कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
6 जुलै 2025
पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला असून कोकणातील इतर भागांमध्ये (मुंबई वगळता) ऑरेंज अलर्ट लागू आहे. कोल्हापूर, सातारा व नाशिक घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
7 जुलै 2025
पुन्हा एकदा पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईसह इतर अनेक जिल्ह्यांना – ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे.
8 जुलै 2025
रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट देण्यात आला आहे.
9 जुलै 2025
तळ कोकण, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा सल्ला काय?
हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात 5 जुलै ते 9 जुलैदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रतितास इतका राहू शकतो. अशावेळी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, प्रशासनाने देखील योग्य ती तयारी ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा