टाळ, चिपळीच्या तालावर वारकऱ्यांबरोबर तरुणीने धरला ठेका; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

 

 

 

 

 

 

Video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या वारी सुरू आहे, त्यामुळे वारीतील व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता वारीतील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी वारकऱ्यांबरोबर नाचताना दिसत आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणांहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. अशातच ते पंढरपूरला जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच पारंपरिक नृत्य करताना दिसतात. आता असाच एक सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!