या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 6/7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागु ; थकबाकी देण्याचे निर्देश ! परिपत्रक दि.14.07.2025

 

 

 

 

 

employees; Instructions to pay arrears ] : सहाव्या / सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागु करुन थकबाकी देण्याचे निर्देश देणेबाबत , आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 14 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 05.02.1999 व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 06.08.2002 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मुळ वेतनाच्या 15% इतका किमान रुपये 200/-

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

 

 05.02.1999 रोजीच्या शासन निर्णयानुसार उपयोजना क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 06.08.2002 रोजीच्या प्रोत्साहन भत्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत . त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मुळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान 200/- तर कमाल 15,00/- रुपये दरमहा मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

 

 

सदर वरील दोन्ही संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करता आदिवासी उपयोजना क्षेत्रांमधील नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागांमध्ये मुख्यालयी कार्यरत असणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित 15 टक्के किमान 200/- तर कमाल 1500/- दरमहा या मर्यादेमध्ये सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्याची आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

 

त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास , ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

 

शासननिर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

IMG 20250715 161032
Oplus_0

 

Leave a Comment

error: Content is protected !!