Satara Viral Video:एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरू युवकाला जमावाने पकडलं आणि त्याची चांगलीच धुलाई केली.l
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या युवकाने मुलीला ताब्यात घेऊन तिच्या गळ्याला चाकू लावला. त्याचवेळी जमावाने प्रसंगावधान दाखवून त्या मुलीला सुरक्षित सोडवलं. सातारतील बसप्पापेठ करंजे या परिसरात ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.
Satara Video : मुलीच्या गळ्याला चाकू लावला
एका युवकाचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यावरुन संबंधित युवकाकडून आधी देखील पीडित मुलीला त्रास देण्यात आला होता. आता त्या शाळकरी मुलीला त्या युवकाने ताब्यात घेतलं आणि तिच्या गळ्याला चाकू लावला.
यावेळी जमलेल्या जमावाने त्या मुलीला सोडण्याची विनंती केली. पण तो युवकाला काही केल्या ऐकत नव्हता. उलट त्या ठिकाणाहून सगळ्यांना जाण्यास तो सांगत होता. ती मुलगीही त्या युवकाला समजाऊन सांगताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे सगळं सुरू असताना समोरच्या काही व्यक्तींनी त्या मुलाचं लक्ष वळवलं. त्याचवेळी मागच्या कंपाऊंडवरून एक तरुण आला आणि त्याने त्या युवकाला मागून पकडलं. त्याचवेळी समोरच्या तरुणांनीही त्याच्यावर झडप घातली आणि त्या युवकाच्या हातातून चाकू काढून घेतला.
एकतर्फी प्रेमातून चाकूने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या युवकाची जमावाकडून चांगलीच धुलाई करण्यात आली. यावेळी घटनास्थळी पोलीस सागर निकम, धीरज मोरे, उमेश आडागळे अमोल इंगवले यांनी युवकाला ताब्यात घेतले.
या आधीही या युवकाने अशाच प्रकार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. संबंधित मुलीला या युवकाने आधीही त्रास दिल्याची माहिती समोर येत आहे.
परिसरात गस्त वाढवण्याची मागणी
दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शाळेच्या मुलींच्या आणि महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा