Viral Video : नऊवारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. कुठलाही कार्यक्रम किंवा समारंभ असू द्या महिला आवडीने नऊवारी नेसतात. नऊवारीवर महाराष्ट्रीयन दागिने परिधान करतात. हा अस्सल मराठी लूक अनेकांचे लक्ष वेधून घेतो. नऊवारीवर लावणी, मराठी गाण्यांवर डान्स तुम्ही अनेकदा बघितला असेल. सोशल मीडियावर अनेक महिला नऊवारी नेसून मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतात पण तुम्ही कधी नऊवारी नेसून महिलांना इंग्रजी गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिलांचा एक ग्रुप इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा