Ladki Bahin Hafta Date रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात आणि आतापर्यंत एकूण 12 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. जून महिन्याचा हप्ता जुलैच्या सुरुवातीला देण्यात आला आणि आता जुलै हप्त्याची तारीखही स्पष्ट झाली आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या (9 ऑगस्ट) आधीच महिलांना आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागामार्फत यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वर्ग केला आहे. संबंधित शासन निर्णय (GR) 30 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
जुलै-ऑगस्ट हप्ते एकत्र नाहीत!
अलीकडे काही माध्यमांमध्ये दावा करण्यात आला होता की रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र दिले जातील. मात्र, काल जाहीर झालेल्या GR नुसार फक्त जुलै महिन्याचा हप्ताच दिला जाणार आहे. म्हणजेच, ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील वेळेनुसार वितरित केला जाईल.
राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना लवकरच रक्कम प्राप्त होणार असल्याने रक्षाबंधनानंतरचा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे.
Disclaimer: वरील लेखात दिलेली माहिती ही अधिकृत शासन निर्णय आणि सार्वजनिक उपलब्ध माध्यमांवर आधारित आहे. कोणतीही योजना, आर्थिक व्यवहार किंवा लाभ घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळ अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा