नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध (POCRA Yojana) अनुदान योजना उपलब्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतात, उदाहरणार्थ, ठिबक सिंचनासाठी ७५% पर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित होतो
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पोकरा अनुदान योजना (POCRA Yojana):
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखड्यामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत.
या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंप संच व पाईप अनुदान योजनाः
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी यापूर्वी विविध योजनामधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (POCRA Yojana) संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटकांतर्गत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप (एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी.) हे वैयक्तिक लाभाचे घटक राबववणे प्रस्तावित आहे.