washing bull before Bail Pola : जालन्यातून एक
धक्कादायक घटना समोर येत आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील खांडवीवाडी शिवरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरज कदम असं मयत मुलाचे नाव आहे. सुरज गुरूवारी गावाजवळील असणाऱ्या खदानीवर बैल धुण्यासाठी गेला होता. बैल धुत असताना सुरजचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. जवळ असलेल्या ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरजला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान पोळा सणाच्या पूर्वसंध्येला झा 00 या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली दरम्यान याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
परिसरात हळहळबैल धुण्यासाठी गेलेल्या सुरज कदम याचा खदानीत बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरज हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचा अचानक पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहद व्यक्त करण्यात येत आहे. सुरजच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने खांडवीवाडी गावावर शोककाळा पर आहे..
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा