कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ताडवाडी येथे एक मोठे एमडी ड्रग्ज बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना माहिती दिली
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी येथील एका निर्जन घरात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.
सोमवार १० ऑगस्टच्या मध्यरात्री ताडवाडी गावातील काही ग्रामस्थांना एका निर्जन घराबाहेर संशयास्पद हालचाली दिसल्या. एका मारुती ब्रेझा कारमधून काही तरुण रात्रीच्या वेळी डोक्यावरून खोकी वाहून नेत होते. ही गाडी गावापासून काही अंतरावर उभी होती. तसेच एक रुग्णवाहिकाही शेताजवळ ठेवलेली होती.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा