सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली चिता
सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं, संतप्त माहेरच्यांनी काय केलंनाशिकच्या चांदवडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच तिची चिता पेटवली. सहा सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू.नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच आपल्या लेकीची चिता पेटवून संताप व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा